
वर्धा
वर्धा जिल्ह्यात वाळु विक्रीसाठी डेपो सुरु
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दि.03/02/2024.
सुधारित वाळु धोरणानुसार 2023-2024 या द्वितीय वर्षासाठी वाळु डेपो सुरु करण्यात आले आहे. हिंगणघाट तालुक्यातील डेपो क्रमांक 5 सावंगी रीठ येथे 1,00ब्रास साठा डेपो क्र.6 मौजा येळी येथे 1 हजार 289.66 ब्रास व वर्धा तालुक्यातीलडेपो क्र.7 मौजा आलोडी येथे 70 ब्रास वाळु साठा आहे.
वाळु खरेदीसाठी जिल्ह्यातील नागरिकांना महाआँनलाईन ( सि.एस.सि) सेतू केंद्रातुन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.महाखनिज या संकेतस्थळावर वाळुची नोंदणी करता येईल.नागरीकांनी 133रुपये प्रती मँट्टिक टन आणि त्यावर 10% जिल्हा खनिजप्रतिष्ठान निधी या दराने वाळु खरेदी करता येईल असे जिल्हाधिकारी राहुल कडिँके यांनी कडवीले आहे.