
खोटे आश्वासन दाखविणारा , अर्थसंकल्प – डॉ. नामदेव किरसान
खोटे आश्वासन दाखविणारा अर्थसंकल्प — डॉ. नामदेव किरसान
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
गडचिरोली
दि. 01/02/2024.
केंद्र सरकारने मागील 10 वर्षाच्या कारकिर्दीत दिलेली आश्वासने पाळली नाहीत, नागरिकांचे उत्पन्न वाढवले नाही, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही. जनतेच्या उत्पन्नात फक्त 1% वाढ झाली. महागाई – बेरोजगारी कमी झाली नाही. या अर्थसंकल्पाने कमी होईल असेही आता वाटतं नाही, अर्थव्यवस्था पूर्णतः डबघाईस आलेली आहे, श्रीमंताच्या व पुंजीपतीच्या उत्पन्नात वाढ झाली. त्याआधारावर देशाची अर्थव्यवस्था गणली जात असेल तर ते धोकादायक आहे.
सरकार वास्तविकता लपवून अर्थव्यवस्था बळकट असल्याचे व ती आणखी बळकट होण्याचे स्वप्न दाखवीत आहे. एकंदरीत बजेट वास्तविकतेला धरून नाही.