गडचिरोली
बांधकाम उपअभियंता बी. सी. धार्मिक बनले तीन उपविभागाचे सत्ताधीश!
कार्यकारी संपादक:- अनुप मेश्राम

बांधकाम उपअभियंता बी. सी. धार्मिक बनले तीन उपविभागाचे सत्ताधीश!
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
कार्यकारी संपादक
अनुप मेश्राम.
गडचिरोली.
जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे उपअभियंता बी.सी. धार्मिक या उपअभियंत्याकडे गेली दिड ते दोन वर्षीपासून कोरची, कुरखेडा, व धानोरा या तिन्ही बांधकाम उपविभागाचा कार्यभार त्यांच्याकडे सोपविल्यामुळे कोरची, धानोरा यां बांधकाम उपविभागाचा कार्यभार दिवसेंदिवस रामभरोसे चालतांना दिसत आहे.
तसेच कोरची, धानोरा या विभागात उपाभियंत्याच्या अनुपस्थितीमुळे कार्यालय ओसाड पडता दिसत आहेत.
उपाभियंत्यांच्या नित्याच्या अनुपस्थितीमूळे कार्यरत अभियंते सुद्धा कार्यालयामध्ये दिसेनासे झालेली आहेत.
जिल्हा परिषद प्रशाशनाने धानोरा, कुरखेडा या विभागात उपाभियंत्याची त्वरित नियुक्ती करण्याची मागणी कार्यालयीन कर्मचाऱ्यात केली जात आहे.