
निवासी अपंग विद्यालय समस्येच्या विळख्यात!
दणका कायद्याचा डिजिटल न्यूज.
कार्यकारी संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली. :-
गडचिरोली शहरातील लांझेंडा येथे प्रगती बहुउद्देशीय अपंग शैक्षणिक संस्था, गडचिरोली द्वारा संचालित ही संस्था अनुदानित असून, या निवासी अपंग विद्यालययात कार्यरत मुला मुलींची ऐकून पटसंख्या 19 आहे. तर शालेय रेकार्ड मध्ये 25 मुलांची पटसंख्या दाखविलेली आहेत.
शाळेत कार्यरत शिक्षकांची संख्या 9 आहे. कर्यरत निवासी अपंग शाळा हीअनेक बाबीनी समस्या ग्रस्त असून. निवासी अपंग शाळेत शिकणारी मुले, मुली यांच्या समस्याकडे हेतू परस्पर दुर्लक्ष केले जात आहे.
अपंग शाळेत शिकणारे गरीब, निराधार मुलांना फक्त जेवण देऊन त्यांना जगविले जात आहे. तर अपंग मुलांचे पुढील भविष्य हे धोक्यात आहे. संचालकांने निवासी अपंग शाळेकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. कार्यरत शिक्षक संचालकांच्या नावाने बोटे मोडताना मुक्याने जगताना दिसत आहेत.