गडचिरोली विधानसभा युवक काँग्रेसचा पदग्रहण सोहळा व आढावा बैठक संपन्न.
येनापुर प्रतिनिधी :- आकाश बंडावार

गडचिरोली विधानसभा युवक काँग्रेसचा पदग्रहण सोहळा व आढावा बैठक संपन्न !
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
येनापुर प्रतिनिधी
आकाश बंडावार
गडचिरोली : –
दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी गडचिरोली येथील विश्रामगृहात गडचिरोली विधानसभा युवक काँग्रेस द्वारा आयोजित आढावा बैठक आणि पदग्रहण सोहळा संपन्न झाला.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मा. कुणालजी राऊत यांच्या सूचनेनुसार सदर आढावा बैठीचा आयोजन करण्यात आला होता. या बैठककीला प्रामुख्याने उपस्थित अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व विदर्भ झोनचे प्रभारी श्री. कुमारजी रोहित तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव याज्ञवालक्य जिचकार यांनी आढावा घेतला असून ऍड. विश्वजीत कोवासे यांनी हा आढावा सादर केला. येत्या काळामध्ये पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करवण्यावर भर देत युवक काँग्रेसची ‘*युथ जोडो, बूथ जोडो अभियान’* राबवून बूथ निहाय समिती स्थापन करण्यावर लक्ष्य केंद्रित करावे तसेच काँग्रेस पक्षाचे विचार तळागळा पर्यंत पोहचवून पक्ष बळकट करावे असे सुतोवाच विदर्भाचे प्रभारी मा. कुमारजी रोहित यांनी केला. ते पुढे म्हणाले, जो युवक काँग्रेसचा कार्यकरता प्रामाणिकपणे काम करेल पक्ष नक्कीच त्त्याला बळ देऊन संधी देणार.
सदर सभेला प्रामुख्याने उपस्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी देखील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
बैठकी शेवटी युवक काँग्रेसच्या कार्यकारणीचा विस्तार करून पद वाटप करण्यात आला. यामध्ये चामोर्शी तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदी श्री. प्रफुल बारसागडे नियुक्ती करण्यात आले तर चामोर्शी तालुका युवक काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी प्रेमानंद गोंगले व नेहाल आभारे यांना नियुक्ती पत्र देण्यात आला. या प्रसंगी नवीन कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांना संबोधन करतांना कोवासे म्हणाले की युवकांना चांगली संधी युवक काँग्रेसच्या माध्यमातून प्राप्त झाली असून या संधीचा सोनं करावा आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता एकत्र मिडून काम करावे आणि काँग्रेस पक्षाचे सर्वसमावेशकतेचे विचार, राहुलजी गांधी यांच्या प्रेम आणि सधभावनेचे विचार सर्वासामन्या जनतेपर्यंत पोहचवण्याचे कार्य करावे तसेच काँग्रेसने देश उभारणीच्या संधर्भात केलेल्या कामाची माहिती द्यावेत असे आव्हान विश्वजीत कोवासे यांनी केला.
यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अश्विन बैस, गडचिरोली विधानसभा अध्यक्ष महेश जिल्लेवार, निलेश बोरिवार, तेजस कोडेकर हेमंत कुमरे, आशिष घेर, हर्षल किरमे, जीवक दांडे, हेमंत कुमरे, शंकर सुरजागडे, गौरव वेटकर, मनोज मंडळ, व मोठ्या संख्येंन युवक काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव नितेश राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रेमानंद गोंगले यांनी केला.