रुग्णालयातील भरती असलेल्या रुग्णाच्या आहारात पोषकताच नाही.!
कार्यकारी संपादक :- अनुप मेश्राम

रुग्णालयातील भरती असलेल्या रुग्णाच्या आहारात पोषकताच नाही.!
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
कार्यकारी संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली। (दि.03.वि. प्र.)
जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती असलेल्या रुग्णाणा सकाळ, संध्याकाळ जेवणात पूरविल्या जात असलेल्या आहारात पोषकता व रुचकरपणाचं जानवत नसल्याचे दिसून आले आहे.
रुग्णालयात उपचारासाठी येणारे अनेक रुग्ण हे बाहेर जिल्ह्यातून येत असल्यामुळे,व शहरात त्यांचे कुणीच जवळीक नसल्यामुळे त्यांना आलेल्या प्रत्येक परिस्थितीला तोंड देऊन दिला जाणारा भोजन आहार नाईलाजाने मुखाट्याने घ्यावा लागते.
.रुग्णाना सकाळी देत असलेल्या अल्पआहार मध्ये दिला जाणारा आलूपोहा हा अतिशय अल्प,बेचव, व पाढूरक्या रंगाचा असून त्यात हळदीचे प्रमाणच नसल्याचे दिसून आले.
भरती रुग्णाना दुधासाठी जोरजोरात हाकबोम केली जाते. काही रुग्णाना दुध भेटते, तर काहींना दूधच भेटतच नाही.लाडवाचा लवलेशही नाही.आपल्या प्रकृतीच्या देखभाली साठी आलेल्या रुग्णाणा,अखेर स्वतःची ओरडही बंद करावी लागते परंतु घेत असलेल्या आहारा बाबत कुणीही हाकबोंब करताना पुढे येत नाही.
सबंधित आहार पुरवठा ठेकेदारांनी, व रुग्णालंय प्रशासनानी रुग्णांना देण्यात येणाऱ्या रोजच्या आहारामध्ये सुधारणा करण्याची मागणी, रुग्णालयात भरती असलेल्या एका अन्याय ग्रस्त रुग्णानी रुग्णालयातील पोषक आहाराच्या सत्यतेला वाचा फोडली आहे.