Breaking
आरोग्य व शिक्षणनागपुर

इंटास फाउंडेशन ठरले हिमोफीलिया रुग्णांसाठी वरदान

उपमुख्य संपादक :- स्वप्नील मेश्राम

 

हिमोफीलिया रुग्णांसाठी वरदान ठरले इंटास फाउंडेश

 

दणका कायद्याचा डिजिटल न्युज 

उपमुख्यसंपादक

स्वप्नील मेश्राम 

 

नागपुर     :-

 

हिमोफिलिया हा जन्मत:च होणारा रक्ताशी निगडित आजार आहे. रक्त गोठण्यासाठी आवश्यक १३ फॅक्टरपैकी एकाही फॅक्टरची कमतरता असल्यास किंवा तो फॅक्टरच रक्तामध्ये नसल्यास, हा आजार संभवतो. अशा रुग्णाला योग्यवेळी आवश्यक तो फॅक्टर न मिळाल्यास, रुग्णाला अंतर्गत रक्तस्त्राव सुरू होऊ शकतो. त्यात रुग्णाचा मृत्यूदेखील होऊ शकतो. यारुग्णांना लागणाऱ्या फॅक्टर इंजेक्शनची किंमत ही अतिशय महागडी असून आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या कुटूंबाला हा खर्च परवडणारा नसतो. अशा रुग्णांना व त्यांच्या कुटूंबासाठी इंटास फाउंडेशन वरदान ठरत आहे.

 

समाजातील दुर्गम भागातील आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या हिमोफिलिया रुग्णांना नि:शुल्क फॅक्टर ८,९ व फिसिओथेरपी किट चे वितरण आणि त्याचबरोबर फिसिओथेरपी व सेल्फ इन्फयुसन शिबिराचे आयोजन राष्ट्रीय स्तरावर सुरु आहे. दिनांक २९ आक्टोबर २०२३ रविवार ला इंटास फाउंडेशन द्वारे हिमोफिलिया सोसायटी नागपूर चॅप्टर च्या सहयोगाने लता मंगेशकर हॉस्पिटल सीताबर्डी येथे हिमोफिलिया रुग्णांना नि:शुल्क फॅक्टर-९ चे वितरण आणि फिजिओथेरपी शिबिरा अंतर्गत फिजिओथेरपी किट चे वितरण करण्यात आले. २९ हिमोफिलिया रुग्णांना फॅक्टर-९ चे वितरण तर ७० हेमोफिलिया रुग्णांना फिजिओथेरपी किट चे वितरण करण्यात आले.

 

 

प्रस्तुत शिबिरामध्ये १०९ लाभार्थ्यांनी सहभाग दर्शविला होता. डॉ.ओंकार कूमत यांनी हिमोफिलिया रुग्णांना होमिओपॅथी उपचारचे महत्त्व व फायदे या विषयी मार्गदर्शन केले. डॉ.अभिनव फडणीस (फिजिओथेरपिस्ट) यांनी रुग्ण व त्यांच्या पालकांना फिजिओथेरपी किटचा वापर कसा करायचा या बद्दल माहिती दिली. प्रस्तुत शिबिरामध्ये हिमोफिलिया सोसायटी नागपूर चॅप्टरच्या सेक्रेटरी डॉ. अंजु कडू, बी.एन.आय च्या संचालिका रिद्धी तेलरामणी, इंटास फॉउंडेशन नागपूरचे प्रोजेक्ट असोसिएट श्री. निखिल वैद्य, एच-प्याप कॉर्डिंनेटर श्री.कालिदास वडमे, अपना घर समुपदेशक प्रविणा गेडाम आणि त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे