Breaking
सिरोंचा

मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत सोमनपल्ली गावात बनविणारा रस्त्या निकृष्ट दर्जाचा…

मुख्य संपादक

 

 

मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत सोमनपल्ली गावात बनविणारा रस्त्या निकृष्ट दर्जाचा ……..

 

दणका कायद्याचा डिजिटल न्युज 

 

सिरोंचा :- 

  1. दि 07/11/ 2023.

 

ठेकेदारांनी मनमानी करुन कामे करत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप …

सिरोंचा – सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली भागातील असलेल्या सोमनपल्ली गावात मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत रस्त्याचे बांधकामाकरिता करोडो रुपयांचे मंजुरी मिळाली होती.

सोमनपल्ली गावातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची आसरअल्ली – पातगुडेम नॅशनल हायवेला जोडणारे महामार्गापासून सोमनपल्ली गावातील वेलदी चंद्र यांच्या घरापर्यंत कामे करायची होती, मात्र संबंधित ठेकेदार यांनी मंजूर असलेल्या रस्त्यावर कामे न करता दुसऱ्या ठिकाणी रस्त्याचे काम करत आहेत.

ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदाराला विचारले असता त्यांनी  माहिती दिलेली नाही.
त्याकरिता गावातील सरपंच आणि उपसरपंच तसेच ग्रामस्थांनी आज मीडिया समोर त्याचे समस्या घेऊन येत संबंधित ठेकेदार यांनी आमच्या गावातील मनमानीने रस्त्याचे कामे करत आहेत,
जिथे शासनाने मंजुरी दिली तिथे रस्त्याचे काम करत नाही, आणि करीत असलेल्या काम पूर्ण निकृष्ट दर्जाचे असल्याचे ग्रामस्थांनी ठेकेदार प्रती मीडिया समोर रोष व्यक्त केला आहे.

त्यावेळी सोमनपल्ली गावाचे सरपंच – पुष्पलाता देवाजी आसम,उपसरपंच – सुरेश सडमके,सदस्य – सरोजीनी तालंडी, माजी सरपंच – विश्वेश्वराव येलाम, माजी उपसरपंच – रमेश गावडे, माजी सदस्य – राधाबाई सडमके, गावातील महिला आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे