
वाहन चालक धडकले तहसीलवर , हिट एण्ड रन कायदा रद्द करण्याच्या मागणी करीता निवेदन…
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दि. ०१/०१/२०२४.
कुरखेडा-
वाहन चालकावर अन्याय करणारा हिट अॅन्ड रन हा काळा कायदा रद्द करण्याचा मागणी करीता आज १ जानेवारी रोजी जय संघर्ष वाहन चालक संघटनेचा वतीने येथील बाजार चौकातून तहसील कार्यालयावर मागण्या संदर्भात घोषणा देत मोर्चा काढण्यात आला व तहसीलदार मार्फत शाशनाला निवेदन पाठविण्यात आले
शाशनाने रस्ते अपघात संदर्भात हिट अॅन्ड रन हा कठोर कायदा अमलात आणण्याचा निर्णय घेतलेला आहे या अंतर्गत रस्ते अपघातात अनावधानाने कूणी दगावल्यास वाहन चालकाला १० वर्षाची शिक्षा व ७ लाखाचा दंड ठोठावण्यात येणार आहे या अन्यायकारक कायद्या विरोधात वाहन चालकानी राज्यव्यापी बंद पूकारलेला आहे तालूका संघटनेने सूद्धा सदर बंद आंदोलनात सहभागी होत आज आपले सर्व प्रवासी मालवाहतूक खाजगी वाहने बंद ठेवत आंदोलनात सहभागी झाले.
हा कायदा अत्यंत कठोर असून जेमतेम मिळकतीवर कूटूंबाचा उदरनिर्वाह करणार्या गरीब वाहन चालकांचे व त्यांचा कूटूंबाचे जिवनच उध्वस्त करणारा आहे या कायद्याचा फेरविचार करण्यात यावा याकरीता आज तहसीलदार ओमकार पवार यांचा मार्फत शाशनाला निवेदन पाठविण्यात आले मोर्चाचे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमूख सूरेंन्द्रसिंह चंदेल तालूका प्रमुख आशिष काळे यानी केले याप्रसंगी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे तालूका अध्यक्ष भारत गावळ सचिव जावेद शेख उपाध्यक्ष शाम थोटे सचीन पंडित कैलाश उईके आशिष हिळको,अनिल ठाकरे,इंन्द्रजीत ताराम, चिंतामन सहारे, हेमंत घोगरे,दिपक मेश्राम,छगन मडावी,प्रदीप मानकर, नासीर शेख,प्रीतम वालदे, हेमंत चंदनखेडे, जयचंद सहारे, रोहिदास निकूरे,रूतीक आकरे, प्रल्हाद मानकर शिवदयाल परिहार तसेच मोठ्या संख्येत वाहन चालक हजर होते.
( गडचिरोली जिल्हा वाहन चालक संघटनेचा न्याय मागणी करीता पूकारण्यात आलेल्या बंद आंदोलनाला जिल्हा शिवसेना (उबाठा) गटाचा पूर्ण पाठींबा असून प्रसंगी रस्त्यावर उतरत आंदोलनात सहभागी होणार अशी माहिती शिवसेना ( उबाठा) जिल्हा प्रमुख सूरेंन्द्रसिंह चंदेल यानी दिली आहे