
महिलेने गळफास घेऊन संपविली जिवनयात्रा.
कुरखेडा तालुक्यातील बाघगाव येथील घटणा .
गडचिरोली,
कुरखेडा .
दि.26/4/24.
कुरखेडा तालुक्यातील बाघगाव येथील विवाहित महिलेने घरातच स्वंयपाल खोलीच्या दरवाज्याला गळफास घेऊन संपवल्याची घटणा आज दि. 25 एप्रिल रोजी घडली.
सौ.प्रतिभा गिरीघर राणे (वय30) असे असुन मयत महिलेचे नाव आहे .प्रतिभा ही सकाळच्या सुमारास घरातील स्वंयपाक खोलीच्या दरवाजाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळुन आली.परंतु गळफास घेतांना तेव्हा कोणीच नव्हते काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे.घटणेची माहिती मिळताच पुराडा पोलिसांनी धाव घेत पंचनामा करून म् तदेह उत्तरीय तपासणीसाठी कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.
प्रतिभाने गळफास का घेतला हे अघाप कळु शकले नाही. पती अपत्य दोन मुले सासुसासरे आहेत तसेच गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.पुढील तपास सुरू आहे.