रोजगार हमी योजनेच्या मजूरांनी शेतकरी कामगार पक्ष, जिल्हाधिकारी संजय दैने यांचे मानले आभार!
कार्यकारी संपादक :- अनुप मेश्राम

रोजगार हमी योजनेच्या मजूरांनी शेतकरी कामगार पक्ष, जिल्हाधिकारी संजय दैने यांचे मानले आभार!
गडचिरोली. (दि.28 एप्रिल )
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
कार्यकारी संपादक.
अनुप मेश्राम.
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात रोजगार हमीचे विविध कामे सुरु करण्यात आली होती.परंतु ,मागील गेली चार महिन्यांपासून या कामावरील मजूरांना त्यांच्या कष्टाची मजूरी न मिळाल्यामुळे होळीसारखा महत्वाचा सणालात्यांना मुकावे लागले.
कामगार शेतकरी पक्षाने वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून रोजगार हमी योजनेच्या मजूरांची मजूरी तातडीने मिळवून द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाच्या माध्यमातून केली होती.
जिल्हा धिकाऱ्यानी निवेदनाची त्वरित दखल घेऊन रोजगार हमी मजूरांची थकीत रक्कम मजुराच्या खात्यावर जमा करणे सुरु केले आहे.
थकीत मजुरी मिळाल्याने जिल्हाभरातील रोजगार हमी योजनेच्या मजुरानी शेतकरी कामगार पक्ष आणि जिल्हाधिकारी संजय दैने यांचे अनंत आभार मानलेले आहेत.