![](https://dankakaydyacha.com/storage/2024/12/IMG-20241212-WA0004-780x470.jpg)
वडसा बांधकाम , कुरखेडा बांधकाम उपविभागातील उप अभियंते कार्यालयात दिसेनासे,!
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
गडचिरोली. दि.११. नोव्हे.)
कार्यकारी संपादक.
अनुप मेश्राम.
प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आशीर्वाद व राजकीय नेत्यांचं पाठबळ आपल्या पाठीशी घेऊन.प्रशासकिय सेवेत मगरगट्ट होवून आपली प्रशासकीय सेवेची वाटचाल करणारे, वडसा कुरखेडा,या सारख्या सार्वजनिक बांधकाम उपविभागातील कार्यरत हे दोन्ही उपअभियंते आपल्या कार्यालयात कधीचं बसताना दिसत नाही.कार्यालयात यांची नित्याची अनुपस्थित सतत दिसून येत असते.
हे दोन्ही अधिकारी एक ते दीड वर्षापासून कार्यालयात न बसता आपल्या घरूनच प्रशासन चालवित असताना दिसत असतात हे दोन्ही अधिकारि महिन्यातून दोन महिन्यातून एकदाच कार्यालयाला भेट देऊन फक्त सही करण्यापूर्ती व स्वतःचा पगार उचलण्यापूर्तीच कार्यालयीन कर्मचाऱ्यांना आपली मुखे दाखवीत असताना दिसतात.
यांना कुणाची भीती नाही.कुणाचे दबाव नाही है दोन्ही अधिकारि मंन मर्जीचे राजे बनून मुक्तकठाने विंहार करतांना दिसत असतात.
कार्यालयीन शिकवलेले पोपट सहेबांपुढे आपली मर्जी संपादन करण्यासाठी साहेबांची गोड गोड प्रशंशा करून कार्यालयीन कामे घेवून साहेबाना भेटण्यासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीना चुकीचे मार्गदर्शन करून त्यांची दिशाभूल करताना दिसतात. साहेब आताच साइडवर गेले.