डॉक्टर बनायचं होतं , पण काळाने घात केला; 5 MBBS विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू
दणका कायद्याचा न्युज
दिनांक 3/12/2024.
केरळ ,
केरळच्या अलाप्पुझा भागात सोमवारी रात्री भीषण रस्ते अपघातात ५ MBBS च्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. ही मुले ज्या कारमधून प्रवास करत होती ती कार केरळ राज्य परिवहन मंडळाच्या बसला धडकली. ही घटना रात्री १० च्या सुमारास कलाकोड परिसराजवळ घडली. हा अपघात इतका भयंकर होता की त्यात संपूर्ण कारचा चक्काचूर झाला. कारचे लोखंडी पार्ट वेगळे करून विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.