
Accident News :
अमरावतीच्या दर्यापूर-अकोला मार्गावर भीषण अपघात; दोन वाहनांच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दिनांक 3/12/2024
अमरावती ,
अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर-अकोला मार्गावर भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. यात दोन वाहनात अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे.
अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर-अकोला मार्गावर भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. यात दोन वाहनात अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. आज दुपारी 3 वाजता दर्यापूर-अकोला मार्गावरील लासुर फाट्याजवळ दोन चारचाकी वाहनात जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की ज्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.