बंगालदेशमधील हिंदुसाठी ठाकरे गट आक्रमक प्रियंका चतुर्थवैदींचं थेट PMमोदींना पत्र लिहीत केली मागणी
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम
बंगालदेशमधील हिंदुसाठी ठाकरे गट आक्रमक ,प्रियंका चतुर्थवैदींचं थेट PMमोदींना पत्र लिहीत केली मागणी ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दिनांक 3/12/2024.
बंगलादेश ,
विधानसभा निवडणुकीत भाजपाने केलेल्या आक्रमक हिंदुत्वाच्या प्रचाराचा ठाकरे गटाला फटका बसल्याचे सांगण्यात येत होते. तसेच हिंदुत्वाबाबत घेतलेल्या मवाळ भूमिकेमुळेही ठाकरे गटाचं नुकसान झाल्याचा दावा केला जात होता. त्या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गट पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या दिशेने वळत असल्याचे संकेत मिळत आहेत.
बांगलादेशमधील हिंदूंच्या प्रश्नावरून ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांविरोधात भारत सरकारनं तातडीने पावलं उचलून तेथील काळजीवाहू सरकारशी संपर्क साधावा, अशी मागणीही प्रियंका चतुर्वेदी यांनी या पत्रामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.