
परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड; आंदोलन पुन्हा चिघळल्याने जमावबंदीचे आदेश
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
परभणी ,
दिनांक 12/12/2024
परभणी शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संविधान प्रतिकृतीच्या नुकसानीमुळे निषेधासाठी जमलेल्या जमावाने आंदोलनाला हिंसक वळण दिले. जिल्ह्यात कलम ३७ (१) अन्वये जमावबंदी लागू असतानाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती असल्याने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू केले आहे.