आरमोरी तालुक्यातील विविध समस्यांना घेऊन, तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयावर बैलबंडी सह धडक मोर्चा
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम

आरमोरी तालुक्यातील विविध समस्यांना घेऊन, तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयावर बैलबंडी सह धडक मोर्चा।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
मुख्य संपादक
आरमोरी :-
दि .७/११/ २०२३
आरमोरी तालुक्यातील विविध समस्यांना घेऊन, तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयावर बैलबंडी सह धडक मोर्चा काढण्यात आला.
यावेळी प्रामुख्याने गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान, माजी आम. आनंदराव गेडाम, प्रदेश काँग्रेस सचिव डॉ. नितीन कोडवते, जि. प. माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप घोडाम, नंदू नरोटे, गडचिरोली गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, किसान काँग्रेस अध्यक्ष वामन सावसाकडे, ओबीसी सेल अध्यक्ष भूपेश कोलते, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, आदिवासी सेल अध्यक्ष छगन शेडमाके, काँग्रेस नेते हरबाजी मोरे, शालिक पत्रे, विजय सूपारे, स्वप्नील ताडाम, विश्वेश्वर दरो, केतुजी गेडाम, दत्तू सोमंनकर, अनिल किरमे, तारकेश्वर धाइत, पिंकू बावणे, अनुसूचित जाती महिला अध्यक्ष वृंद्धाताई गजभिये, रोशनी बैस, लोणारे ताई, सह जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने तालुक्यातील शेतकरी, महिला भगिनीं उपस्थित होते.