Breaking
मुल

3 बळी घेणारा नरभक्षक वाघ अखेर वनविभागाच्या जाळ्यात : वाघाला केले जेरबंद , वनविभागाला मोठे यश…

मुख्य संपादक संतोष मेश्राम .

 

 

3 बळी घेणारा नरभक्षक वाघ अखेर वनविभागाच्या जाळ्रयात : वाघाला केले जेरबंद , वनविभागाला मोठे यश…

 

मुल / चितेगाव 

दिनांक 10/4/25.

 

मरेगाव… चितेगांव… परिसरातील वाघ काल रात्री वनविभागाचे प्रयत्नने पकडण्यात आला ज्याने चितेगांव येतील तरुणाचा बळी घेतला होता सावली – चंद्रपूर वनविभागातील सावली वनपरीक्षेत्र व चिचपल्ली वनपरीक्षेत्रात धुमाकूळ घालून ३ व्यक्तींचा बळी घेणारा, अनेकांना जखमी वाघिणीला बुधवारी रात्रौ जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे.सावली वनपरीक्षेत्रात निलेश दुर्गा कोरेवार, शेषराव नागोसे यांचा तर चिचपल्ली वनपरीक्षेत्रात मल्लाजी येगावार या मेंढपाळाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. अनेकांना वाघाने जखमी केले होते त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण होते. वाघाला पकडण्यासाठी नागरिकांचा वनविभागवर रोष होता परंतु अनेकदा वाघाने हुलकवणी दिली. अखेर बुधवारी रात्रौ वाघास सावली वनपरीक्षेत्रात वाघास जेरबंद करण्यात आले. ही कारवाई मुख्य वनसनरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक विकास तरसे, सावलीचे वनपरीक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे नेतृत्वात वनविभागाच्या चमूने नरभक्षी वाघिणीला जेरबंद केले. चंद्रपूरचे वनपरीक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगावकर यांनी सदरचे वाघिणीला बेशुद्ध केले. वाघाला जेरबंद केल्याने नागरिकांनी वनविभागाचे आभार मानले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे