अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने शाळेच्या संरक्षक भिंतीला जोरदार धडक दिल्याने ट्रँक्टर चालक जागीच ठार ,अवैध रेती तस्करी बितली जीवावर !
मुख्य संपादक

अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने शाळेच्या संरक्षक भिंतीला जोरदार धडक दिल्याने ट्रँक्टर चालक जागीच ठार ,अवैध रेती तस्करी बितली जीवावर !
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दिनांक 20/03/2024.
देसाईगंज : तालुक्यातील मोहटोला येथे
अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने शाळेच्या संरक्षक भिंतीला जोरदार धडक दिल्याने चालक जागीच ठार झाल्याची घटना दि.२० मार्चला पहाटे ५.०० वाजताच्या सुमारास घडली
प्राप्त माहितीनुसार, चिखली येथील अवैध रेती तस्कर योगेश शेंद्रे हा ट्रॅक्टरने रेतीची अवैध रित्या तस्करी करीत असतांना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रॅक्टर चालकाने मोहटोला येथील जि.प.शाळेच्या भिंतीला जबर धडक दिली. या अपघातात चालक राकेश गजबे रा. पोटगांव ता. देसाईगंज याचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला नंबरप्लेट नव्हते. तर सदर प्रकरण सावरण्याकरीता अवैध रेती तस्करांने हालचाली सुरु केल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या आशिर्वादाने मोहटोला घाटातून दररोज अवैध रेती तस्करी केल्या जाते परंतू चिरीमिरी मिळत असल्याने अधिकारी वर्ग सुध्दा याकडे दुर्लक्ष करीत आहेत तर परिसरातील गावांमध्ये OBC साठी आताच 15 दिवसापूर्वी प्रत्येक गावात जवळपास 25 ते 30 घरकुल मंजूर झाल्याने त्यांना अद्यापही शासनाने रेतीची पूर्तता केली नाही त्यामुळे त्यांना चोरीची रेती घेतल्या शिवाय पर्याय नाही. अश्यानांही शासनाने रेती दिली असती तर तसेच अधिकाऱ्यांनी तस्करांच्या मुस्क्या आवळल्या असत्या तर सदर अपघात घडलच नसता अशी मोहटोला व परिसरात चर्चा सुरू आहे