देश-विदेश
ललित मोदीला भारतात आणणं आता अशक्य? वणूआतू देशाचं घेतलं नागरीकत्व ।
मुख्य संपादक संतोष मेश्राम .

ललित मोदीला भारतात आणणं आता अशक्य? वणूआतू देशाचं घेतलं नागरीकत्व
देशविदेश ,
IPL चे माजी चेअरमन ललित मोदी याने त्यांचं भारतीय पासपोर्ट सरेंडर करण्यासाठी अर्ज केला आहे. ललित मोदीभारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. आता त्याने प्रशांत महासागराच्या एका बेटावरील देश वनुआतुचं नागरिकत्व मिळवलं आहे. लंडन येथील भारतीय दूतावास कार्यालयात ललित मोदीने भारतीय पासपोर्ट सरेंडर करण्यासाठी अर्ज केला असून नियम आणि कायद्यानुसार पुढील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती परराष्ट्र खात्याच्या प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली आहे.