देश-विदेश
कर्ज काढुन बायकोला शिकवल,शिक्षण पुर्ण होताच पती सोबत राहण्यास नकार ..
मुख्य संपादक संतोष मेश्राम

कर्ज काढुन बायकोला शिकवल,शिक्षण पुर्ण होताच पती सोबत राहण्यास नकार ..
बिहार .
बिहारमधील बेगुसरायमध्ये एका तरुणाने आपली जमीन विकून आपल्या पत्नीला शिकवलं. मात्र पतीने आरोप केला आहे की, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पत्नीचा दृष्टिकोन बदलला आहे. तिला आता पती आणि सासरच्या लोकांसोबत राहायचं नाही. १५ जून रोजी महिलेने तिचे वडील आणि भावाला बोलावलं आणि घरातील सर्व सामान घेऊन माहेरी गेल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तिच्या सासूने सून, वडील व भावाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.