राजकिय
535 हिरे लगडलेले कडे दिड कीलो सोनं ,आदित्य ठाकरे यांनी प्रतीज्ञा पत्रात जाहिर केली स्वतः ची संपत्ती ।
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम .

535 हिरे लगडलेले कडे दिड कीलो सोनं ,आदित्य ठाकरे यांनी प्रतीज्ञा पत्रात जाहिर केली स्वतः ची संपत्ती ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
मुख्य संपादक
संतोष मेश्राम .
दिनांक 25/10/2024.
वरळी :-
युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. अशातच आदित्य ठाकरेंनी प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती जाहीर केली आहे. आदित्य ठाकरेंनी त्यांच्याकडे सोन्याचे कडे, रत्नजडीत हार, सोन्याची बिस्किटे आदी ऐवज असल्याचे जाहीर केले आहे. तसेच त्यांच्याकडे एकूण २३.४३ कोटींची संपत्ती आहे. २०१९ मध्ये त्यांनी एकूण संपत्ती १७.६९ कोटी रुपये जाहीर केली होती. म्हणजेच पाच वर्षांत आदित्य यांच्या संपत्तीत ५.७४ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
Aditya Thackeray wealth declare has 535 diamonds bangal, 1.5 kg of gold