विस्तार अधिकारी बबलू आत्राम यांना त्वरीत हटविण्याची मागणी.
मुख्य संपादक .:- संतोष मेश्राम .

विस्तार अधिकारी बबलू आत्राम यांना त्वरीत हटविण्याची मागणी.
दलित पॅंथर!
गडचिरोली
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
दणका कायद्याचा डिजिटल न्यूज.
कार्यकारी संपादक.
अनुप मेश्राम
दि.१९ सप्टेंबर.
धानोरा पंचायत समितीमध्ये गेले दोन-तीन वर्षापासून कार्यरत असलेले पंचायत विस्तार अधिकारी बबलू आत्राम हे आपल्या प्रशासकीय कार्यालयीन कामात अतिशय निष्क्रीय, कामचुकार.,बेजबाबदार अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे.
माहितीचे अधिकाराच्या माध्यमातून ग्रामसेवकाकडून मागितलेली माहिती व अपिलीय आदेश काढण्या करिता टाळाटाळ, व हेतू पुरस्कर दुर्लक्ष करून आपल्या कार्यक्षेत्रातील सबंधित ग्रामसेवकाशी संगणमत करून त्यांना अभय देण्याचा प्रयत्न करीत असताना दिसतात.
धानोरा पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेले बबलू आत्राम यांच्या अधिकारी क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या बऱ्याचशा ग्रामपंचायत भ्रष्टाचाराने बरबटलेल्या असून अनेक ग्रामसेवकांनी ठक्कर बाबा.व पेसा अंतर्गत मिळणारी पाच टक्के अबाध शासकीय शासकीय निधी दुरुपयोग करून स्वतःच हडप किल्ल्याची माहितीच्या अधिकारातून सत्यता पुढे आलेली आहे.
माहितीच्या अधिकारातून ज्या ज्या व्यक्तींनी माहिती मागितलेली आहे.विस्तार अधिकारी बबलू आत्रम यांनी अजूनपर्यंत माहितीच्या अधिकाराची अमल बजावणी शासकीय पाठपुरावाही सुधा केलेला नसल्यामुळें त्यांच्या कार्यरत क्षेत्रातील कामनगड मुरुमगाव पंनेमारा दुर्गापुर, येथे कार्यरत ग्रामसेवकांची दिवसेंदिवस शासकीय निधी हडप करण्याची हिंमत वाढताना दिसत आहे.
अशा निष्क्रिय, कामचूकार बेजाबदार विस्तार अधिकारी बबलू आत्राम यांनी त्वरित हकालपट्टी करण्याची मागणी जिल्हा पॅंथर पॅंथरच्या जिल्हा कार्यकर्त्यांनी केलेली आहे. आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एक लेखी निवेदन सुद्धा देणार असल्याचे कार्यकर्त्याकडून सांगितले जात आहे.