राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. राष्ट्रध्वज राष्ट्रगीत,पुष्पमाला व संविधानाचे वाचन करूनच करावी.
कार्यकारी संपादक :- अनुप मेश्राम

राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. राष्ट्रध्वज राष्ट्रगीत,पुष्पमाला व संविधानाचे वाचन करूनच करावी.
गडचिरोली. ( दि.3 एप्रिल )
दणका कायद्याचा डिजिटल न्यूज.
कार्यकारी संपादक.
अनुप मेश्राम.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुधा, गडचिरोली जिल्हा परिषदेने राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती 14 एप्रिल 2024 ला साजरी करताना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या हस्ते पुष्प अर्पित करूनच साजरी करण्यात यावी.
राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती साजरी करताना,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला राष्ट्रध्वज लावणे.मुख्य कार्यकारीधिकारी यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पित करणे. सामूहिक राष्ट्रगीत व संविधानाच्या प्रस्तावनाचे वाचन करणे. व सर्वांनी कार्यालयात उपस्थित राहून बाबासाहेबाना पुष्पमाला अर्पित करण्यासाठी.सामाजिक कार्यकर्ते, अपंग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मुकुंदराव उंदीरवाडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, व कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांना एका लेखी निवेदनातून विनंती केलेली आहे.
निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते मुकुंदराव उंदीरवाडे.मोरेशवर शिडाम,दिवाकर साहरे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.