
पाऊसधारा कवी संमेलनात प्रभाकर देविदास दुर्गेचा सत्कार…
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
गडचिरोली
दिनांक 25/6/24.
मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर अंतर्गत मराठीचे शिलेदार, बिनधास्त न्युज, साप्ताहिक साहित्य गंध, बि .एस. फोर. न्युज यांच्या सौजन्याने दिनांक 23. 6. 2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन ऊरवेला सोसायटी वर्धा रोड नागपूर येथे ज्येष्ठ कवयित्री कुसुमलता वाकडे लिखित पंख पैजण या कथासंग्रहाचे प्रकाशन तसेच पाऊसधारा कवीसंमेलन 2024 आयोजीले होते. या कवी संमेलनात राज्यभरातून विविध ठिकाणाहून कवी/कवयित्री यांनी सहभाग नोंदवला होता.
त्यात गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुका अंतर्गत येणाऱ्या अडपल्ली चक या गावचे युवा कवी/लेखक प्रभाकर देविदास दुर्गे यांचा देखील सहभाग होता त्यांनी आपली स्वरचित कविता “प्रातिक्षेच्या वाटेवरून” सादर करून उपस्थित जेष्ठ व श्रेष्ठ मान्यवर, सर्व उपस्थित कवी/कवयित्री व जमलेल्या सर्व रसिक वर्गांची टाळ्यांची दाद मिळवत सर्वांची मने मोहून घेतलीत. त्यांचा साहित्य क्षेत्रातील प्रवास पाहून उपस्थित मान्यवर संमेलनाध्यक्षा मा. सविता धमगाये (ज्येष्ठ कवयित्री, लेखिका नागपुर), प्रमुख अतिथी मा. डॉ. अनिल पावशेकर (नागपूर स्तंभ लेखक),प्रमुख मार्गदर्शक मा. रत्नाकर तिडके (ज्येष्ठ साहित्यिक भंडारा),प्रमुख मार्गदर्शक मा. अरविंद उरकुडे (विश्वस्त प्रमुख), प्रमुख पाहुणे मा.नितेश क्षिरसागर (गोंदिया), मा.आदिती सिरसीकर (नागपुर), मा. सुरज भिलकर (नागपूर) व या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक, मराठीचे शिलेदार चे सर्वेसर्वा मा. राहुल पाटील सर या सर्व मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ, जागर मराठीचा साहित्यिक अंक देऊन युवा कवी प्रभाकर देविदास दुर्गे यांचा सत्कार करण्यात आला त्या सत्काराबद्दल त्यांचे साहित्यिक सहकारी, मित्रपरिवार, गाववासीय व नातेवाईकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.