
खानगाव ( खडसंगी ) येथील युवकाला वाघाने केले ठार..
दणका कायद्याचा डिजिटल न्यूज
मुख्य उपसंपादक
स्वप्निल मेश्राम ✍️✍️✍️
मो.नं. ९८८१८२१३८१
चंद्रपूर
चिमूर :- तालुक्यातील खानगाव (खडसंगी) ता. चिमूर जि. चंद्रपूर येथील अंकुश खोब्रागडे वय 35 वर्षीय युवकाला वाघाने ठार केले .
त्याबाबत कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी व सविस्तर माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमुर लोकसभाचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान, विधानसभा समन्वयक डॉ. सतीश वारजूकर, माजी जि.प. सदस्य गजाननभाऊ बुटके, चिमुर काँग्रेस शहर अध्यक्ष अविनाश अगळे, युवक काँग्रेस अध्यक्ष नागेश सट्टे, इरफान पठाण, सुभाष कारेकर, बबन गुगळे यांनी भेट दिली.
तसेच सविस्तर माहिती घेऊन वनविभागाच्या अधिकाऱ्याला पाचरण करुन वाघाचा बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या आणि कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी सांगण्यात आले.