पाच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार,करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या , कडकडीत बंद,व रास्तारोको आदोलन , आक्रोश मोर्चा,
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दि. ११/०३/३०२४.
गडचिरोली / एटापल्ली
पाच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, संतप्त नागरिक उतरले रस्त्यावर.
गडचिरोली:- एटापल्ली तालुक्यातील एका पाच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराची घटना नुकतीच घडली हाेती. या घटनेच्या निषेधार्थ आज (साेमवार) ला सकाळी दहा वाजताच्या सुमारास जारावंडी सह परिसरातील गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला. आज जारावंडीकरांनी आक्रोश मोर्चा काढत आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली. या माेर्चात महिलांचा लक्षणीय सहभाग हाेता.
या घटनेच्या निषेर्धात नागरिकांनी जारावंडी मुख्य चौकात रास्ता रोको आंदाेलन केले हाेते. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी नागरिकांनी केली हाेती. तसेच जारावंडीतील सर्व व्यापारी प्रतिष्ठान व्यवहार बंद ठेवण्यात आले हाेते.
आजच्या माेर्चात महिलांनी माेठ्या संख्येने सहभाग नाेंदविला. यावेळी माेर्चेक-यांनी घाेषणाबाजी करत जारावंडी सह परिसर दणाणून साेडला.
दरम्यान महामहीम राष्ट्रपती,मुख्यमंत्री ,राज्यपाल, महाराष्ट्र शासन गृहमंत्री ,पोलीस महासंचालक ,पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक याना निवेदन देऊन कठोर शिक्षेची मागणी केली आहे