Breaking
गडचिरोली

वांगेतुरीच्या जंगलात पोलिस नक्षल चकमक,नक्षली साहित्य जप्त

मुख्य संपादक

वांगेतुरीच्या जंगलात पोलिस नक्षल चकमक,नक्षली साहित्य जप्त

 

वांगेतुरीच्या जंगलात पोलिस नक्षल चकमक,नक्षली साहित्य जप्त

 

गडचिरोली:- सीमावर्ती व अतिसंवेदनशील भागात नव्याने उभारणी करण्यात आलेल्या वांगेतुरी पोलिस मदत केंद्रापासून पूर्वेस सात किलोमिटर अंतरावर जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दल आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक झाली यावेळी नक्षल्यांनी जंगलात पळ काढला. पोलिस दलानी घटनास्थळावरून नक्षली साहित्य जप्त केले. ही घटना दिनांक सात फेब्रुवारी बुधवारी घडली.

काल संध्याकाळी एक विश्वासार्ह माहिती मिळाली की काही सशस्त्र नक्षलवादी कॅडर कांकेर – नारायणपूर – गडचिरोली जाणाऱ्या त्रिकोणी रस्त्याच्या पॉइंटवरील वांगेतुरीपासून 7 किमी पूर्वेला हिदूर गावात विध्वंसक कारवाया करण्यासाठी व नव्याने उघडलेल्या पो.स्टे. वांगेतुरी आणि पो.म. के. गर्देवाडा या आउट पोस्टची रेकी करण्याच्या उद्देशाने तळ ठोकून आहेत

त्यावरून मा अप्पर पोलीस अधीक्षक अभियान श्री. यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चार C-60 पार्त्यांचा समावेश असलेले एक पथक सदर भागात शोध मोहिमेवर पाठवण्यात आले सदर पथक हिदूर गावापूर्वी 500 मीटर अंतरावर असताना त्यांचेवर सुमारे 19:00 वाजता जोरदार नक्षल्यांकडून गोळीबार करण्यात आला त्याला गडचिरोली पोलीस दलाने प्रत्युत्तर दिल्यावर घनदाट जंगल आणि अंधाराचा फायदा घेत नक्षलवादी पळून गेले. परिसरात झडती घेतली असता – पिट्टू, स्फोटक साहित्य, वायरचे बंडल, आयईडी बॅटरी, डिटोनेटर्स, क्लेमोर माइन्सचे हुक, सोलर पॅनेल आणि नक्षल साहित्य इत्यादी मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले आहेत. त्या भागात नक्षलविरोधी अभियान राबवले जात आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे