अवैध रेती भरलेला ट्रक पकडला महसूल विभागाची रेती तस्करावर धडाकेबाज कारवाई
मुख्य संपादक

अवैध रेती भरलेला ट्रक पकडला महसूल विभागाची रेती तस्करावर धडाकेबाज कारवाई.
अवैध रेती भरलेला ट्रक पकडला महसूल विभागाची रेती तस्करावर धडाकेबाज कारवाई महादापेठ येथे ट्रकवर कारवाई
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
मारेगाव तालुक्यातील अवैध मार्गाने रेतीची तस्करी करीत असलेल्या ट्रकवर महादापेठ येथे महसूल विभागाने धडाकेबाज कारवाई केली.असून रेती तस्करांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मारेगाव तालुक्याला समृद्ध असा वर्धा नदीचा किनारा लाभला आहे. त्यामुळे या वर्धा नदीच्या मार्गाने मोठया प्रमाणावर रेतीची तस्करी होत असते.आजपर्यँत अनेक रेती तस्करांवर कारवाई सुद्धा झाली.परंतु रेतीची अवैध वाहतूक मात्र बंद झालेली नाही.अशातच दि. 6/2/2024 रोज मंगळवारला रात्री 8-30 वाजताच्या सुमारास ट्रॅक्टर व ट्रक वाहनाने हे गोरखधंदे करीत असल्याचे सातत्याने महसूल विभाग त्यांच्या कायम मागावर होते.
रात्री तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या मार्गदर्शनात महसूल पथक रेती तस्करांच्या मागावर असतांना रेती भरलेला ट्रक बोरी गदाजी ते करणवाडी मार्गाने रेती भरून येणारा हायवा (MH-36 1675) हे अवैध वाहन महादापेठ येथे पकडण्यात आले. पंचनामा करून दंडात्मक कारवाई साठी ताब्यात घेतलेला ट्रक तहसील कार्यालयात येथे जमा करण्यात आल्याची माहिती आहे. ही कार्यवाही उत्तम निलावाड तहसीलदार मारेगांव,भगत नायब तहसीलदार,रघुनाथ खंडाळकर मंडळ अधिकारी आणि विजय कनाके वाहन चालक यांनी केली.
परिणामी, रेती तस्करांच्या दिवसागणिक मुजोऱ्या वाढून प्रशासनाला तुरी देण्याचे षडयंत्र नित्याचेच झाले असून सातत्याने महसूल विभाग ऍक्शन मोडवर येत रेती तस्करांचे मनसूबे हाणूण पाडण्यासाठी पारदर्शक अधिकारी तहसीलदार,मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल सातत्याने प्रयत्नशील आहेत