तरुणांच्या माघ्यमातुन मुंबई पोलिसांनी सापळा रचला ,लाँरेन्स बिश्रोई टोळीचा शुटर हनीट्रँपमघ्ये अडकला ।
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम .

तरुणांच्या माघ्यमातुन मुंबई पोलिसांनी सापळा रचला ,लाँरेन्स बिश्रोई टोळीचा शुटर हनीट्रँपमघ्ये अडकला ।
मुख्य संपादक:- संतोष मेश्राम.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज।
दिनांक 19/10/2024.
मुंबई ।
मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर सुखवीर उर्फ सुख्खा याला पानिपत येथून अटक केली आहे. सुख्खावर सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. शूटर सुख्खा याला ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी तिन महिन्यापासून तयारी करत होते. यासाठी पोलिसांनी एका तरुणीची मदत घेतल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांच्या योजनेनुसार तरुणीने पानिपतमधील हॉटेल अभिनंदन येथे रूम बुक केली आणि सुख्खाला फोन केला. तरुणी म्हणाली, मी खूप मद्य प्यायली आहे आणि कुठेतरी पानिपतमध्ये आहे, पण शहरात कुठल्या ठिकाणी आहे ते माहित नाही. मी लोकेशन पाठवत आहे, इकडे ये. यानंतर सुख्खा तरुणीच्या लोकेशनवर पोहोचला. याचवेळी तरुणीने दुसऱ्या मजल्यावर तैनात असलेल्या मुंबई पोलिसांच्या पथकाला गुपचूप मिस कॉल केला. पथकाने पहिल्या मजल्यावर पोहोचून सुख्खाला अटक केली.