देश-विदेश
बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा दाना चक्रीवादळ, भारत, बांगलादेश आणि म्यानमारला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता
मुख्य संपादक:- संतोष मेश्राम .

बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा दाना चक्रीवादळ भारत, बांगलादेश आणि म्यानमारला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
बंगाल –
दिनांक 19/10/2024.
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम.
बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा चक्रीवादळ निर्माण झालं असून, त्यानं दाना असं नामकरण करण्यात आलं आहे. तसेच दाना चक्रीवादळाबाबत धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दाना चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालच्या दक्षिण भागापासून ते दक्षिण भारतापर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच हे चक्रीवादळ २४ ते २६ ऑक्टोबरदरम्यान समुद्रकिनाऱ्यावर आदळू शकतं. या चक्रीवादळामुळे भारत, बांगलादेश आणि म्यानमारला सर्वाधिक फटका बसणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.