देश-विदेश
PSI पुर्वपरीक्षा उत्तीर्ण अन् मुलींचे आगमन ; दुहेरी आनंदातील अंमलदाराचा अभ्यास करतांना मृत्यू ।
मुख्य संपादक:- संतोष मेश्राम

PSI पुर्वपरीक्षा उत्तीर्ण अन् मुलींचे आगमन ; दुहेरी आनंदातील अंमलदाराचा अभ्यास करतांना मृत्यू
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
दिनांक 13/10/2024.
पुणे .
१३ ऑगस्ट २०१४ रोजी पोलिस दलात भरती झालेले भिसे यांचे उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न होते. सप्टेंबर महिन्यात पूर्व परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. डिसेंबर मध्ये नियोजित मुख्य परीक्षेसाठी मैदानी चाचणीची तयारी करत होते. रविवारी त्यांनी मॉक टेस्ट दिली. रात्री कुटुंबासह जेवण करून अभ्यासासाठी खोलीत गेले. रोज पहाटे मैदानी सरावासाठी उठणारे रमेश लवकर न उठल्याने त्यांना भाऊ उठवण्यासाठी गेला. मात्र, प्रतिसाद देत नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. पुस्तक वाचत असतानाच झोप लागलेल्या रमेश यांच्या छातीवर उपनिरीक्षकाच्या परीक्षेचे पुस्तक तसेच होते.