
सुरजागडच्या ट्रक ने आणखी एक अपघात . एक जागीच ठार… तर एक गंभीर जखमी …..
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
दि .28/11/2023
एटापल्ली :- ( येलचिल )
आज सायंकाळच्या सुमारास सुरजागडच्या ट्रकने एटापल्ली मार्गावरील येलचिल येथे बाईक घेऊन जात असणाऱ्या बाईक स्वारास जोरदार धडक दिल्याने एक युवक जागीच ठार तर एक गभीर जखमी झाल्याची घटणा घडली आहे .
तसेच अपघातात ठार झालेला युवक नामे .नाव सचिन नागुलवार अहेरी येथील आहे , तर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या युवकाचे नाव नामे गुपयाचा शंकर असल्याचे सांगितले जात आहे.सुरजागडच्या ट्रक ने अनेक लोकांचे अपघातात जिव गेले आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षक देण्यात यावा अशी मागणी लोकांतून केली जात आहे.