चातगाव वनपरिक्षेत्रातील अवैध अतिक्रमण बांधकामाला वनपरिक्षेत्र अधिकारी,वनपाल जबाबदार! योगाजी कुडवे.
कार्यकारी संपादक :- अनुप मेश्राम

चातगाव वनपरिक्षेत्रातील अवैध अतिक्रमण बांधकामाला वनपरिक्षेत्र अधिकारी,वनपाल जबाबदार! योगाजी कुडवे.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
कार्यकारी संपादक
अनुप मेश्राम.
गडचिरोली. ( दि. 28. नोव्हेबर ).
गडचिरोली वनविभागा अंतर्गत येत असलेल्या, व वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालया अंतर्गत चातगाव येथे मोठ्या प्रमाणात गावाला लागून अवैध अतिक्रमण बांधकाम केलीली आहेत.
मोठ्या प्रामाणात होत असलेली व झालेली अतिक्रमणे ही चातगाव वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. एस बी. पडवे यांचे कार्यकाळात झालेली असल्याचे सांगितली जातं आहे.
चातगाव हे गाव बाजार पिठाचे ठिकाण असून, बाजारपेठ खुर्सा गावाकडे जाणाऱ्या मार्गावर असून, याच मार्गाला लागून पाण्याची टाकी सुधा आहे.,पाण्याच्या टाकीला लागून अंदाजे दोन ते तीन एकर वन विभागाच्या जागेवर लोकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून पक्के बांधकाम सुद्धा केलेली आहेत.
सदर होत असलेले अतिक्रमित बांधकाम हे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना खुले आम दिसत असताना सुद्धा वनअधीकाऱ्यानी या अतिक्रमणा कडे हेतू पुरस्पर दुर्लक्ष केल्या मुळे अतिक्रमणाचे दिवसेंदिवस मोठे प्रमाण वाढताना दिसत आहे.
अतिक्रमण धारक व वनविभागाचे अधिकारी यांच्यात हितसबंध झाले तर नसतील ना? अशी शन्का, कुशन्का आजूबाजूच्या परिसरात निर्माण होताना दिसत आहे.
झालेले व होत असलेले अतिक्रमण बांधकाम त्वरित हटविण्याची मागणी योगाजी कुडवे व त्यांच्या समर्थकांनी केलेली असून वनविभागा पुढे आंदोलन करण्याचा ईशारा सुद्धा दिलेला आहे.
तसेच जिल्हाधिकारी गडचिरोली. वनमंत्री सुधीर मुंनघनटीवार यांना निवेदन सुद्धा दिलेले आहे.