
भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते उडेरा येथे विकास कामांचे भूमिपूजन.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दि.०३/०२/२०२४.
एटापल्ली:-तालुक्यातील उडेरा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
एटापल्ली तालुक्यातील उडेरा येथील नागरिकांची मागणी लक्षात घेता भाग्यश्री ताई आत्राम यांनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे विकास कामांसाठी निधीची मागणी केली.आदिवासीबहुल एटापल्ली तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी क्षणाचाही विचार न करता मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी मोठी निधी उपलब्ध करून दिली.नुकतेच माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम या दुर्गम भागाचा दौरा करत विकास कामांचे भूमिपूजन केले.दरम्यान भाग्यश्री ताई यांचे गावात आगमन होताच गावकऱ्यांनी जंगी स्वागत केले.
यावेळी माजी प स सभापती बेबीताई नरोटी,माजी जि प सदस्य ज्ञानकुमारी कौशी,येमली चे सरपंच ललिता मडावी,नगर पंचायतचे गट नेता जितेंद्र टिकले,लक्ष्मण नरोटी,राजू नरोटी,गाव पाटील राजू गावडे,अजय गावडे, कृष्णा नरोटी,रामा गावडे,माजी उपसरपंच मुजफ्फर अली शेख,गोंगलु गावडे,निर्मला गावडे,दसरी गावडे,वनिता झाडे,ललिता डोंगरे,मल्लू बाई इप्पावार,मीरा बाई बोरकर आदी उपस्थित होते.