
गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रीय गणित दिवस आज साजरा
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
गडचिरोली
दि ६/०२/२०२४.
गोंडवाना विद्यापीठात नॅशनल काँसिल फॉर सायन्स अँड टेकनोलॉजी कमुनिकेशन, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेकनोलॉजी भारत सरकार आणि राजीव गांधी सायन्स अँड टेकनोलॉजी कमिशन , महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने तसेच पदव्युत्तर शैक्षणिक गणित विभागाच्या वतीने राष्ट्रीय गणित दिवस आज साजरा करण्यात आला.
यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे , विशेष उपस्थिती म्हणून कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण ,वक्ते म्हणून मुंबई विद्यापीठाचे स. प्रा. दीपक सारवे, एल.एडी. कॉलेज नागपूर,डॉ.पायल हिरनवार , एन. एस. सायन्स कॉलेज , मूलचेरा ज्ञानदेव पुसतोडे, गणित विभागप्रमुख सुनिल बागडे, आदींची उपस्थिती होती.उपस्थित वक्त्यांची गणित विषयावरील व्याख्याने झाली.यानंतर गणित विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर प्रदर्शनीची मान्यवरांनी पाहणी करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
प्रास्ताविक गणित विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सुनिल बागडे यांनी केले. संचालन विद्यार्थ्यांनी आश्विनी गायकवाड,आभार विकास आचेवार
कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी तसेच स. प्रा. यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स. प्रा. संदीप कागे, शिवाजी चेपटे, अमोल पिंपळकर या सहकार्य केले.