डॉ. प्रणय खुणे यांची राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जनआंदोलनाच्या तयारीत.!
मुख्य संपादक संतोष मेश्राम

डॉ. प्रणय खुणे यांची राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जनआंदोलनाच्या तयारीत.!
गडचिरोली (दि.०१ मार्च)
कार्यकारी संपादक.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
अनुप मेश्राम.
गडचिरोली जिल्ह्यातील व एटापल्ली तालुक्यातील कर्रेम भागातील पेसा अंतर्गत येत असलेल्या सीए,एफ,आर जंगल आणि सामूहिक वनहक्क पट्ट्याची जमीन वनविभागाने ग्रामसभेला विश्वासात न घेता एफ, डी, सी, एम यांच्याकडे सदर भूखंड परस्पर स्थानंतरित केलेले आहे.
सदर वनहक्काच्या जमीनी साठी या भागातील समस्त ग्रामस्थानी विशेष ग्रामसभेचे आयोजन करून एटापल्ली तालुक्यातील मौजा डुंम्मे,जवेली,पंदेवाही, गुरुपल्ली, कर्रेम, कोहकल कोंदावाही, पिंडीगुड्डम, या गाव परिसरातील सर्व नागरिकांनी एकत्रित येऊन संबंधित विभागाला सदर जागा एफ,डी,सी,एम,ला हस्तांतरित न करण्याचा ठराव पारित केला. ग्रामसभेचा ठरावास नजुमानता वनविभागाने सदर जमीन एफ.डी.सी.एम.या विभागांकडे हस्तांतरित करण्यात आली. वनविभाग वन विकासाच्या नावाने एफ,डी,सी,एम ला संपूर्ण अधिकार देऊन जंगल तोडण्याचा जणु सपाटाच सुरु केला.
एटापल्ली तालुका असो, की जिल्ह्या स्तरावरील कोणतही तालुका असो.ग्रामसभेच्या ठरावाची अंमलबजावणी जिल्ह्यात होणेआज अतिशय गरजेचे असताना सुद्धा गडचिरोली जिल्ह्यात ग्रामसभेच्या ठरावाची अंमलबजावणी होताना दिसतच नाही.
एटापल्ली तालुक्यातील समस्त नागरिकांनी जिल्हाधिकारी गडचिरोली व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांची भेट घेऊन अन्यायाच्या विरोधात निवेदन देऊन जिल्हास्तरावर लढा देण्याचा संकल्प केला डॉ खुणे यांनी दिलेल्या तक्रारीची दखल घेऊन जिल्ह्यातील कोणत्याही ग्रामसभेवर अन्याय होऊ देणार नसल्याचे सांगितले. जिल्ह्यात ग्रामसभेच्या ठरावाला केराची टोपली दाखविली जात असेल तर गडचिरोली जिल्ह्यात विराट जनआंदोलन करण्याचा इशारा सुध्दा डॉक्टर प्रणय खुणे यांच्या मानव धिक्कार संघटनेने दिलेला आहे.