आदिवासी गोंड-गोवारी युवा संघटना अडपल्ली चक तर्फे कवी. प्रभाकर दुर्गे यांचा सत्कार…
संपादक .

आदिवासी गोंड-गोवारी युवा संघटना अडपल्ली चक तर्फे कवी प्रभाकर दुर्गे यांचा सत्कार…
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
मुलचेरा / अडपल्ली चक .
दि.28/ 12 /2023.
आदिवासी गोंड-गोवारी युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने अडपल्ली चक. ता. मुलचेरा. जि. गडचिरोली येथे दिनांक २८, २९, ३० डिसेंबर २०२३ तिन दिवसीय भव्य कबड्डी सामन्यांचे आयोजन केले .
या कार्यक्रमाच्या उदघाटनाप्रसंगी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे उदघाटक मा. दिपकदादा आत्राम ( बीआरएस नेते माजी आमदार अहेरी विधानसभा क्षेत्र ). सहउदघाटक मा. सौ. अनिताताई आत्राम ( माजी जि.प. सदस्य गडचिरोली ). अध्यक्ष मा. कुबडे साहेब ( से. नि. नायब तहसीलदार गडचिरोली ). उपाध्यक्ष मा. विनोद डि. झाडे ( माजी ग्रा.प. सदस्य अडपल्ली माल ). व इतर मान्यवर तसेच समस्त गावकरीवासीयांच्या उपस्थित आदिवासी गोंड-गोवारी युवा संघटना व गावकऱ्यांनी या भव्य कबड्डी सामन्याचे औचित्य साधुन त्याच गावी वास्तव्यास असणारे युवा कवी, लेखक सन्मा. प्रभाकर देविदास दुर्गे यांचा साहित्यक्षेत्रातील प्रवास पाहुन आज महाराष्ट्रात विविध ठिकाणी आपल्या नावासह गावचे सुद्धा नाव रोशन केले ही आमच्या गावकऱ्यांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे म्हणून या कार्यक्रमाला लाभलेले उदघाटक मा. दिपकदादा आत्राम ( बीआरएस नेते माजी आमदार अहेरी विधानसभा क्षेत्र ) यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा मोठ्या जल्लोषात सत्कार करण्यात आला. या सत्काराबद्दल समस्त गावकरी, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच साहित्यिक सहकारी त्यांचे मनोबल वाढवत त्यांची प्रशंसा केली.