Breaking
आष्टी

महात्मा ज्योतिबा फुले आष्टी ,कला महाविद्यालयाचे विशेष शिबिर चपराळा येथे संपन्न

मुख्य संपादक

 

महात्मा ज्योतिबा फुले आष्टी ,कला महाविद्यालयाचे विशेष शिबिर चपराळा येथे संपन्न.

दणका कायद्याचा डिजिटल न्यूज.

 

आष्टी:गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे पंचप्राण व उन्नत भारताकरिता युवाशक्ती या संकल्पनेवरील विशेष श्रम संस्कार शिबिर दिनांक 9 ते 15 जानेवारी दरम्यान चपराळा येथे संपन्न झाले.

शिबिराचे उद्घाटक वनविभागातील क्षेत्र सहाय्यक मा.संजय जुनघरे यांनी वन विभागाविषयी माहिती देत शिबिरार्थींना श्रमप्रतिष्ठा जोपासण्या विषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. संजय फुलझेले यांनीश्रम संस्कार शिबिरात शिबिरार्थी स्वयंसेवकांनी वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी व्हावे,व्यक्तिमत्व विकास करण्याकरिता हे शिबिर महत्वपूर्ण ठरेल असे विचार मांडले .उपसरपंच दयानाथ कोकेरवार यांनी व पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.

शिबिरात पशू चिकित्सा शिबिर व मार्गदर्शन कार्यक्रमांतर्गत पशुधन पर्यवेक्षक प्रमोद निमसरकार, रुपेश कळंबे,ममता भैसारे यांनी गावातील गुरांची तपासणी केली. गावातील विविध गुरांचे लसीकरणही करण्यात आले .यावेळी पशुधन पर्यवेक्षक प्रमोद निमसरकार यांनी पशुधनाची घ्यावयाची काळजी, विविध आजार व त्यावरील निदान याविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. चपला या गावातील एकूण ४२ परिवारांचा पशुपालन हा व्यवसाय असल्यामुळे या गावातील गायींची संख्या 120 , म्ह्शी ५३ एकूण १७३पाळीव प्राणी व शेळ्या आहेत. त्या अनुषंगाने पशूचिकित्सा शिबिर उपयुक्त ठरले.

आरोग्य तपासणी शिबिरात डॉ. खुशबू करंगम, आरोग्य सेविका छाया बीटपल्लीवार, पुष्पा बोटावाऱ यांनी ग्रामस्थांच्या आजाराची तपासणी करून निदान केले.

बौद्धिक कार्यक्रमांतर्गत ‘सरी वरंबा पद्धत आणि शेती ‘या विषयावर प्रा. बी. के. राठोड यांनी शेतकऱ्यांना शेतीच्या आधुनिक तत्रज्ञानपद्धती विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. इतिहासाचे सिंहावलोकन व पंचप्रण या विषयावर प्रा. ज्योती बोबाटे यांनी मार्गदर्शन केले .भारतीय परंपरांचा अभिमान बाळगत ,विविध जखमांना पुसून टाकत देदिप्यमान भारताच्या वाटचालीकरिता स्वयंसेवकांनी कर्तृत्व गाजवयाविषयीचे आवहान मान्यवरांनी केले. राजमाता जिजाऊ या विषयावर सुषमा कुलसंगे यांनी तर स्वामी विवेकानंद व युवा जागर या विषयावर प्रा.राजकुमार मुसने व शुभम पुन्नेलवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .’आपत्ती व्यवस्थापन ‘या विषयावर चान्सलर ब्रिगेडियर प्रशिक्षणार्थी शुभम गंधारे यांनी मार्गदर्शन केले .मतदार जागृती संदर्भात डॉ. गणेश खुणे यांनी मार्गदर्शन केले. ‘व्यक्तिमत्व विकास ‘या विषयावर प्रा.धनश्री चिताडे यांनी तर ‘जागर जाणिवेचा’ विषयावर केंद्रप्रमुख दिलीप बारसागडे यांनी मार्गदर्शन केले. मानवाधिकार ,उन्नत भारत व स्त्रीशक्ती, जल व्यवस्थापन व पर्यावरण संवर्धन या विषयावर राजकुमार मुसणे यांनी मार्गदर्शन केले. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद या महामानवाची दिंडी ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागाने उत्साहात काढण्यात आली. याकरिता प्रीतम , प्रज्ञा व रोहित या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले ,राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदांची वेशभूषा धारण केली होती. महामानवांच्या प्रतिमा आणि महामानवांच्या वेशभूषेतील स्वयंसेवक या आकर्षणाने दिंडीला ग्रामस्थांनी उदंड प्रतिसाद दिला. दिंडीच्या आयोजनाकरिता तंटामुक्त समितीचे अध्यक्ष साईनाथ गुरनुले, उपसरपंच दयानाथ कोकेरवार, व्यंकंना बंटीवार व प्रवीण कावळे यांनी सहकार्य केले. गावातील महिलांनी विविध गीते सादर करत व भजनांच्या माध्यमातून दिंडीला रंगत आणली.

दररोज सकाळी व्यायाम, प्राणायाम योग नृत्य, श्रमदान , दुपारी बौद्धिक कार्यक्रम व रात्रौ प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे शिबिराचा आनंद ग्रामस्थांनी घेतला. प्रेरणा गीते ,आदिवासी नृत्य ,लावणी ,विविध नृत्यांच्या तालावर तरुणाई थिरकली. प्रबोधनपर नाट्याने जनजागृती करण्यात आली. चपराळा येथे होणाऱ्या केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजना संदर्भात विविध खेळाचे मैदान स्वयंसेवकांच्या सहकार्याने तयार करण्यात आले. चपराळा हे गाव मुख्य मार्गापासून आडवळणाचे असूनही या गावातील गुणवत्तावान खेळाडू

शैलेश दयानाथ कोकेरवार याने

600 मीटर धावणे व उंच उडी राज्यस्तरीय स्पर्धेत क्रमांक पटकाविल्याबद्दल व प्रीती राजू गुरनूले

उंच उडी जिल्ह्यातून प्रथम गोळा फेक प्रथम क्रमांक पटविल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने खेळाडूंचा सत्कार करून भावी वाटचाली करिता शुभेच्छा देण्यात आल्या.

समारोपीय कार्यक्रमात उपसरपंच दयानाथ कोकेरवार यांनी स्वयंसेवकांचे कौतुक करीत शिबिरादरम्यान गावातील वातावरण संस्कारक्षम झाल्याचे स्पष्ट केले. समारोपीय कार्यक्रमास उपसरपंच दयानाथ कोकेरवार,सुशांत परमनिक,देवाजी आदे,सविता पिपलशेंडे ,निता आदे , जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पी. आर. उरेते उपस्थित होते.

वनवैभव शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष मा.बबलुभैया हकीम, सामाजिक कार्यकर्त्या शहीन भाभीजी हकीम यांच्या मार्गदर्शनाखाली व महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय फुलझेले यांच्या दिशादर्शनाने राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा .राजकुमार मुसने यांच्या नेतृत्वात संपन्न झालेल्या शिबिराकरिता महाविद्यालयातील प्रा . ज्योती बोबाटे, प्रा. भारत पांडे, डॉ.गणेश खुणे,प्रा रवी शास्त्रकार, प्रा.रवी गजभिये, शिक्षकेतर कर्मचारी राजू लखमापुरे, निलेश नाकाडे, संतोष बारापात्रे, सुजित बाच्याळ, विनोद तोरे, मुस्ताक शेख, सवयंसेवक हिमांशू उराडे ,निगम वेलादी, स्नेहल बट्टे, ग्रामपंचायतचे सचिव वसंतजी बारसागडे,अशोकजी कावडे, छायाताई आदे,मुख्याध्यापक पी.आर. उरेते ,सविता आदे ,प्रवीण कावळे यांनी सहकार्य केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे