
प. पू. शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना आष्टीच्या वतीने महाप्रसादाचे वितरण
नवनियुक्त ठाणेदार काळे यांचा पुष्पगुच्छ देऊन संघटनेच्या वतीने करण्यात आला सत्कार ….
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
गडचिरोली / आष्टी
दि. ८/ मार्च २०२४.
आष्टी/ प्रतिनिधी :- चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील प.पू. शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना आष्टी याच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावर बाहेर गावाहून येणाऱ्या यात्रेकरूंना आष्टी येथील चौकात मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
महाप्रसाद वितरण सोहळ्याप्रसंगी आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक काळे, माजी पोलीस पाटील शंकर पाटील मारशेट्टीवार व अन्य मान्यवर उपस्थित होते.
प.पू.शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेतर्फे महाप्रसाद वितरण सोहळ्याप्रसंगी शंकर पाटील मारशेट्टीवार यांनी भगवान शिवशंकर (महादेव)व रयतेचे राजे हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व कोणत्याही संघटना चालवत असताना कसल्या प्रकारच्या अडचणी निर्माण होतात. त्या अडचणींना जो सामोर जातो तो जीवनामध्ये यश संपादन करतो.या चौकात गेल्या ३ वर्षापासून सुरू आहेत हे पुढे सुरळीत चालू ठेवावे असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमात नवनियुक्त ठाणेदार काळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालक व आभार प्रदर्शन प .पू.शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेचे प्रसार व प्रचार प्रमुख सुरेश औतकार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प.पू. शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेचे सर्व पदाधिकारीऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले