
महाराष्ट्र मिनिडोर/काळी पिवळी ऑटो संघटना घुग्घुसच्या फलकाचे अनावरण .
प्रतिनिधी चंद्रपूर
घुग्घुस :येथील महाराष्ट्र मिनिडोर/काळी पिवळी ऑटो संघटनेच्या फलकाचे अनावरण शुक्रवार, २६ जानेवारी रोजी ११ वाजता भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
याप्रसंगी फलकाची विधिवत पूजा करण्यात आली तसेच अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले व ऑटो चालकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. चालक मालकांनी ऑटो स्टॅन्ड मिळाल्याबद्दल भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष संतोष सिंह चंदेल, राकेश याटावार, सिनू सुद्दाला, देवराज गडपेल्लीवार, विलास भगत, प्रभाकर डांगे, विकास बोढे, बंडू भगत, राजू भरणे, चंदू थिपे, संजय गेडाम, सिनू इसारप, साजन गोहणे,तुलसीदास ढवस,विवेक तिवारी,धनराज पारखी, मिलिंद पानघाटे,रज्जाक शेख, अमोल वाकडे, सुरेंद्र जोगी, नाजीमा कुरेशी व चालक मालक उपस्थित होते.