
चार नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलीसांनी केले चकमकीत ठार
गडचिरोली :–
जिल्ह्यातील अहेरी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या रेपनपल्लीच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये काल १८ मार्चला रात्री भीषण चकमक झाली. या चकमकीत चार नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलीसांनी ठार केल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी सर्चिंग ॲापरेशन सुरू केले असल्याचे सांगितले जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.अहेरी उपपोलीस मुख्यालयातून सी-60 आणि सीआरपीएफ क्यूएटीची अनेक पथक यासच अतिरिक्त एसपी ऑपरेशन यतीश देशमुख यांच्या नेतृत्वात परिसरात शोधमोहीम सुरु आहे.
पुढेआलेल्या माहितीनुसार, परिसरात असलेल्या कोलामार्का येथे आज पहाटे सर्च ऑपरेशन सुरु असताना सी-60 दलांच्या एका पथकावर नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. याला पथकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. गोळीबार थांबल्यानंतरपरिसराची झडती घेतली असता 4 पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. naxalites killed in Repanpalli गोळीबाराच्या ठिकाणाहून एक एके 47, एक कार्बाइन आणि 2 देशी बनावटीचे पिस्तूल, नक्षलवादी साहित्य आणि सामान जप्त करण्यात आले आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये डीव्हीसीएम वर्गेश, डीव्हीसीएम मागटू, पलटन सदस्य कुरसंग राजू आणि पलटन सदस्य कुडिमेट्टा व्यंकटेश यांचा समावेश आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. या नक्षल्यांवर ३६ लाखांचंबक्षीस होतं. या चकमक आणि कारवाई विषयी आज पोलीस अधीक्षक संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार आहे.