जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती अध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याबद्दल शंकर भाऊ ढोलगे यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव !
कार्यकारी संपादक अनुप मेश्राम

जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती अध्यक्षपदावर नियुक्ती झाल्याबद्दल शंकर भाऊ ढोलगे यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव !
गडचिरोली
दिनांक 11/5/24.
दणका कायद्याचा डिजिटल न्यू ज
कार्यकारी संपादक
अनुप मेश्राम.
जिल्ह्यातील अतिशय मागासलेल्या आल्लापल्ली सारख्या दुर्गम , अतिदुर्गम, अति संवेदनशील भागात स्वतःचा जीव ओतून अनेक आंदोलनात व सामाजिक चळवळीमध्ये हिरारीने पुढाकार घेवून , अनेक गोर,गरीब,आदिवासी बांधवांना मदतीचा हात देवून, व त्यांच्या प्रत्येक सुख दुःखाला धावून जाणारे , शंकर ढोलगे या संघर्षशील नवतरुणाच्या, कार्यकर्तृत्वाची , त्यांचात असलेल्या त्यागमय, सेवाभावी वृत्तीची दखल घेवून ,अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी दुर्गम ,अतिदुर्गम भागातील अन्यायग्रस्त आदिवासी व इतर समुहातील गोर,गरिबांना न्याय मिळावा , त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी व जिल्ह्यात दिवसेंदिवस फोफावत चाललेल्या भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी त्यांच्या खांद्यावर फारमोठी जबाबदारी टाकून त्यांची गडचिरोली जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करून त्यांना जिल्हा स्तरावर काम करण्याची नवीसंधी दिली आहे.
त्यांच्या नवनियुक्ततीने परिचित त्याचे अनेक चाहते , व सामाजिक चळवळ मध्ये काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचेवर अभिनंदचा वर्षाव करून त्यांच्या नव नियुक्तीचे स्वागत सुद्धा केलेले आहे.