
अनखोडा येथे दुचाकी व ट्रकचा भिषण अपघात ! अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार
दिनांक 10/4/25.
आष्टी / अनखोडा
आष्टी चामोर्शी महामार्गावरील 353 नॅशनल हायवे आष्टी पासून जवळच असलेल्या अनखोडा बस स्टॉप जवळ सुमारे आठ वाजून पंधरा मिनिटांनी आष्टी वरून उमरी गावला जात असताना आणि ट्रक हा गडचिरोली वरून आष्टी कडे येत असताना अनखोडा येथील सोसायटीच्या जवळ भीषण अपघात झाला त्या अपघातामध्ये दुचाकी चालक होमेश विकास अलगमकार वय २१ राहणार उमरी तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली याला ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे नेण्यात आले व त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. व ट्रक चालक रामहीत शिंग यादव वय ५५ राहणार डोखटनिया जिल्हा गाजीपूर उत्तरप्रदेश असे ट्रक चालकाचे नाव आहें
ट्रक क्रमांक MH 34 B ग 7905 असून सदर घटनेची माहिती मिडताच पोलीस निरीक्षक विशाल काळे स्वतः आपल्या कर्मचाऱ्यांसोबत दाखल होऊन स्वतःच्या गाडीमध्ये सदर व्यक्तीला ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे पोहोचवण्यासाठी मदत केली व सदर घटनेची तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.