
गडचिरोली येथे शासकीय ओबीसी विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाचे लोकार्पण।
खासदार डॉ. नामदेव किरसान यांची उपस्थिती..
गडचिरोली :
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गडचिरोलीत ओबीसी मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र शासकीय वसतिगृह सुरू करण्यात आले. त्याचे उद्घाटन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रमुख उपस्थित पार पडले. खासदार डॉ. किरसान यांनी वसतिगृहामुळे शिक्षण घेण्याच्या मिळालेल्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन युवकांना केले.
यावेळी त्यांच्या सोबत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, आमदार.डॉ.देवराव होळी, माजी खा. अशोक नेते, माजी आम. डॉ. नामदेव उसेंडी, प्रशांत वाघरे, रवी वासेकर, हेमंत जंबेवार सह सर्वपक्षीय नेते व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी, जात पडताळणी समितीचे उपायुक्त देवसुदन धारगावे, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी चेतन हिवंज, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त योगेंद्र शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते.