Breaking
क्राईमदेश-विदेश

मुलीने आंतरजातीय प्रेम विवाह केल्याने वडिलांनी मनात राग ठेऊन चक्क जावयाला केले ठार ।

संपादक - संतोष मेश्राम

 

मुलीने आंतरजातीय प्रेम विवाह केल्याने वडिलांनी मनात राग ठेऊन चक्क जावयाला केले ठार ।

 

दणका कायद्याचा डिजिटल न्युज .

मुलीने प्रेमविवाह केल्याने संतप्त वडीलाने जावयाला चाकुने भोकसले  ।

छत्रपती संभाजीनगर:-

मुलीने प्रेमविवाह केला म्हणून संतप्त वडीलाने जावयाला चाकुने भोकसून यमसदनी पाठवले असल्याची संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील इंदिरानगरमध्ये घडली आहे. लग्ना नंतर केवळ तीनच महिन्यात सासऱ्याने जावयाचा काटा काढला या प्रकरणी मुलीचे वडील आरोपी गीताराम किर्तीशाही आणि मुलीचा चुलत भाऊ आप्पासाहेब किर्तीशाही यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या दोघेही फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अमित साळुंखे याचे त्याच्या बाल मैत्रिणी सोबत प्रेमसंबंध होते. मात्र दोघांचा धर्म वेग – वेगळा असल्याने दोघांच्याही घरच्यांकडून या लग्नाला विरोध होता. मात्र घरच्यांच्या विरोधाला डावलून अमित व विद्या यांनी एप्रिल महिन्यात पळून जाऊन लग्न केले. काही दिवसांनी अमितच्या कुटुंबीयांनी दोघांना स्वीकारल्याने 2 मे रोजी ते घरी परतले. मात्र, विद्याच्या कुटुंबातील सदस्यांनी दोघांनाही स्वीकारले नव्हते. याउलट विद्याचे वडील आणि चुलत भाऊ अमितला जीवे मारण्याची धमकी नेहमीच देत होते.

शेवटी 14 जुलै रोजी विद्याचे वडील आणि चुलत भावाने संभाजी नगरच्या इंदिरानगरमध्ये दोघांनी आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून अमितवर चाकूने गंभीर वार करून हत्येचा प्रयत्न केला. या घटनेत अमित गंभीर रित्या जखमी झाला होता. त्याच्या पोटात व छातीत खोलवर वार झाल्याने गंभीर अवस्थेत त्याला घाटी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र, 12 दिवसानंतर अमितशी मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली व गुरुवारला उपचारादरम्यान अमितचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला, असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे