
दोन चिमुकल्या विद्याथिँनीचे लैंगिक शोषण; हरभजन संतापला ,CM शिंदेंना टँग करत व्यक्त केला संताप ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
ठाणे :-
दिनांक 18/8/24.
शनिवारी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. बदलापूरमध्ये एकाच शाळेत चार वर्षांच्या दोन चिमुकल्या विद्यार्थिनीसोबत लैंगिक शोषण झाल्याची बाब समोर आली आहे. एका नामांकित शाळेतील चार वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर नराधमाने अत्याचार केले आहेत. या प्रकरणात एका मुलीवर अत्याचार करण्यात आले आहेत, तर दुसऱ्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पालकांनी शाळा प्रशासनाला माहिती दिल्यावर मुलींची खासगी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणी नंतर मुलींवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणावरून माजी क्रिकेटपटू आणि खासदार हरभजन सिंगने संताप व्यक्त केला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत संतप्त प्रतिक्रिया दिली.