निर्दयी बापाने 5 वर्षीय मुलाला इमारतीवरुन फेकले ; खाली उभ्या असलेल्या व्यक्तीने झेलुन वाचवला जिव ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
दिनांक 10/09/2024.
उत्तरप्रदेश :-
उत्तर प्रदेशातील देवरिया येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका निर्दयी बापाने आपल्या 5 वर्षीय मुलाला मेडिकल कॉलेजच्या दुसऱ्या मजल्यावरुन खाली फेकून दिले. सुदैवाने खाली उभ्या असलेल्या एका व्यक्तीने मुलाला आपल्या हातात झेलले आणि त्याचा जीव वाचवला. यानंतर लोकांनी आरोपी बापाला बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.
सदर कोतवाली पोलिस ठाण्याचे प्रभारी दिलीप सिंह यांनी सांगितले की, आरोपी वडिलांना ताब्यात घेण्यात आले, परंतु त्याच्या कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार नोंदवली नाही, त्यामुळे आरोपीला सोडून देण्यात आले आहे.