देश-विदेश
महाकुंभमेळाव्यातील दुर्घटनेनंतर योगी सरकार ॲक्शनमध्ये, सर्व VIP पास रद्द वाहनांना प्रवेश बंदी .
मुख्य संपादक

महाकुंभमेळाव्यातील दुर्घटनेनंतर योगी सरकार ॲक्शनमध्ये, सर्व VIP पास रद्द वाहनांना प्रवेश बंदी l
दिनांक.२/२/२५.
उत्तर प्रदेश,
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर बुधवारी मौनी अमावस्येच्या दिवशी अमृत स्नानासाठी कोट्यवधी भाविक आले. त्या ठिकाणी ब्राह्म मुहूर्तावर एक ते दोन वाजण्याच्या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाले. ३६ जखमींवर उपचार सुरू आहेत.
दुर्घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने पावले उचलली आहेत. महाकुंभमेळा परिसरात वाहनांच्या ये-जा करण्यावर बंदी घालण्याचे आणि सर्व व्हीआयपी पास रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.