दलित वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा ।
मुख्य संपादक
संतोष मेश्राम.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दिनांक 25/10/2024.
कर्नाटक:-
कर्नाटकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. दलित समाजाच्या वस्तीला आग लावल्याप्रकरणी कोप्पल जिल्हा न्यायालयाने 101 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या आरोपींना अलीकडेच न्यायालयाने दोषी ठरवले होते, तर काल(गुरुवारी) शिक्षा सुनावण्यात आली. ॲट्रॉसिटी प्रकरणात एवढ्या मोठ्या संख्येने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा होण्याची राज्याच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.